घरकुल मार्टमुळे महिलांचा विकास होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST2021-02-12T04:39:28+5:302021-02-12T04:39:28+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत शेलूबाजार येथे बचतगटांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या घरकुल मार्टचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

घरकुल मार्टमुळे महिलांचा विकास होणार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत शेलूबाजार येथे बचतगटांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या घरकुल मार्टचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सर्व साहित्य एकाच ठिकाणी आणि योग्य दरात मिळण्याकरिता ग्रामविकास विभागाद्वारे ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास पं. स. सभापती दीपाली इंगोले, जि. प. सदस्य डोफेकर, माजी सभापती भास्कर पाटील शेगीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत ठाकरे म्हणाले, उमेद अभियानातून महिलांनी अधिक सक्षम कसे व्हावे, अभियानातील लाभाचा फायदा कसा घ्यावा तसेच महिलांनी आधुनिक युगात कायार्तून ग्लोबल व्हावे, नवनवीन संकल्पनांद्वारे महिलाचे जीवनमान कसे उंचावेल, यावर प्रकाश टाकला. यावेळी वाल्हेकर, पं. स. सदस्य सविता लांभाडे, ग्रा. पं. सदस्य जयकुमार गुप्ता, प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे, परिहार, सुधीर खुजे उपस्थित होते.