घरकुल लाभार्थिंसाठी तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:09+5:302021-02-05T09:29:09+5:30
घरकुल बांधकामांना गती देणे, अपूर्ण घरकुल बांधकामे पूर्ण करणे, घरकुलासाठी अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे आदी उद्देशांतून महाआवास अभियान राबविण्यात ...

घरकुल लाभार्थिंसाठी तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ !
घरकुल बांधकामांना गती देणे, अपूर्ण घरकुल बांधकामे पूर्ण करणे, घरकुलासाठी अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे आदी उद्देशांतून महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. घरकुल लाभार्थिंना बांधकामविषयक साहित्य योग्य दरात एकाच ठिकाणी मिळावे याकरिता जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियान यांच्या संयुक्त पुढाकारातून प्रत्येक तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ची सुविधा उपलब्ध केली जात आहे. यात महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. वाशिम तालुक्यात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उमेद अभियानांतर्गत कार्यरत प्रगती ग्रामसंघ सुपखेला (ता.वाशिम) यांनी कार्यरत केलेल्या घरकुल मार्टचा प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी पट्टेबहादूर, पंचायत समिती सभापती गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे, गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे, सरपंच विनोद पट्टेबहादूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.