शालेय पोषण आहारात निघाले किडलेले धान्य
By Admin | Updated: September 12, 2014 01:46 IST2014-09-12T01:46:33+5:302014-09-12T01:46:33+5:30
मानोरा तालुक्यातील जि.प.शाळेतील प्रकार.

शालेय पोषण आहारात निघाले किडलेले धान्य
मानोरा: जिल्हा परिषदेच्या स्थानिक उच्च माध्यमिक व प्राथमिक मराठी शाळेत वर्ग १ ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात चक्क कीड लागलेले हरभरे वापरण्यात आले होते. स्थानिक बिरसा मुंडा मंडळाच्या सदस्यांनी पोषण आहाराची तपासणी के ल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.
मानोरा येथील शिवाजी नगर परिसरातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक व प्राथमिक मराठी शाळेतील वर्ग १ ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत मटकी, चण्याची उसळ व खिचडीचे वितरण करण्यात येते. गुरुवार, ११ सप्टेंबर रोजीही या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या आहारात हरभर्यांचा वापर करण्यात आला होता; परंतु यामधील हरभरे च क्क कीड लागलेले होते. शिवाजी नगर परिसरातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक व प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असतो, अशी तक्रार पालकवर्गाकडून काही दिवसांपासून करण्यात येत होती. त्यानुसार गुुरुवारी विद्यार्थ्यांसाठी उसळ तयार करण्यात येत अस ताना बिरसा मुंडा मंडळाचे सदस्य तेथे आले. त्यांनी ही उसळ निरखून पाहिली असता त्यामध्ये कीड लागलेले हरभरे टाकण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. ही उसळ शाळेतील विद्यार्थ्यांच्या खाण्यात आली असती, तर मोठा अनर्थ होऊ शकला असता; परं तु बिरसा मुंडा मंडळाच्या युवा सदस्यांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. या युवकांनी उसळ पाहिल्यानंतर लगेचच मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार या अधिकार्यांनी या खिचडीची पाहणी करून पंचनामा करीत खिचडीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.