वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रंगले ‘बहिष्कार नाट्य’
By Admin | Updated: November 12, 2014 23:24 IST2014-11-12T23:24:09+5:302014-11-12T23:24:09+5:30
शिक्षणाधिकार्यांसोबत गैरवर्तणुक प्रकरण, सभा तहकुब.

वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रंगले ‘बहिष्कार नाट्य’
वाशिम : : जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकार्याच्या पित्याने शिक्षणाधिकार्यांसोबत गैरवर्तणुक केल्याचे कारण समोर करून १२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत अधिकारी व कर्मचार्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे अपमाणित झालेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही अधिकारी व कर्मचारी सभेला उशिरा आल्याचे कारण समोर करून सभा तहकुब केली. वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाज ता आयोजीत केली होती. शिक्षणाधिकारी पेंदोर यांच्यासोबत एका पदाधिकार्याच्या पित्याने गैरवर्तणुक केल्याचे कारण समोर करून सभेला अनु पस्थित राहले. पदाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांना हा प्रकार सांगितल्यानंतर दुपारी ४ वाजता अधिकारी व कर्मचारी सभेला उपस्थित राहले. तब्बल तीन ते चार तास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, पंचायत समितीचे सभापती व जि.प. सदस्यांना ताटकळत बसावे लागले. मिनी मंत्रालयातील सदस्यांना जि.प. चे अधिकारी व कर्मचारी सन्मानपुर्वक वागणुक देत नाहीत अशाही संतप्त प्रतिक्रिया सभागृहात उमटल्या. यावेळी सभागृहात वाशिम पंचायत समितीचे सभापती विरेंद्र देशमुख, जि.प. सदस्य उस्मान गारवे, स्वप्नील सरनाईक, विकास गवळी, गजानन अमदाबादकर, चंदु जाधव, यांच्यासह महिला सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या सर्व नाट्यमय घडामोडी नंतर अध्यक्षाच्या परवानगीने उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सभा तहकुब केली. ही सभा १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा घेण्यात येणार असल्याची सुचना दिली. * ऐन वेळेवर मिळते ह्यप्रोसेडींगची कॉपीह्ण यापुर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १४ ऑगस्ट २0१४ रोजी पार पडली होती. या सभेमधील ह्यप्रोसेडींगची कॉपीह्ण जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींना किमाण १0 दिवसात मिळणे अपेक्षीत आहे. मात्र, आपला सावळा गोंधळ कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी जि.प. प्रशासन ह्यप्रोसेडींग कॉपीह्ण सर्वसाधारण सभेच्या दिवशी ऐन वेळेवर सर्वांकडे सापविते. या प्रकारामुळे जि.प. सदस्य व पं.स. सभापती यांनी खेद व्यक्त केला.