माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची घेण्यात आली सामान्य ज्ञान स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:31+5:302021-08-27T04:44:31+5:30
मुख्याध्यापक रमेश आडे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी कला,क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याला महामारी विषयक अटी व ...

माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची घेण्यात आली सामान्य ज्ञान स्पर्धा
मुख्याध्यापक रमेश आडे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी कला,क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याला महामारी विषयक अटी व शर्तींचे पालन करण्याला प्राधान्य देत असतात. कारखेडा येथील सामाजिक कार्यात भाग घेणारे शशिकांत राठोड यांनी माध्य. आणि उ. माध्य. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी रुची निर्माण व्हावी म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये रोशन अनिल पवार यांनी प्रथम क्रमांक, कोमल संतोष डगवार यांनी द्वितीय तर प्रणय संतोष पिंगाणे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री आडे आणि शशिकांत राठोड यांच्याकडून सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले.