स्व जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण अभिवादन

By Admin | Updated: July 3, 2014 02:01 IST2014-07-03T02:00:13+5:302014-07-03T02:01:47+5:30

वाशिम येथे ज्येष्ठ स्वातंत्रता संग्रामसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांना भावपूर्ण अभिवादन.

Gautam Buddha greetings to Jawaharlal Darda | स्व जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण अभिवादन

स्व जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण अभिवादन

वाशिम : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्रता संग्रामसेनानी श्रद्धेय स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना बुधवार २ जुलै रोजी वाशिम जिल्हा कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राजस्थान शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोमाणी यांनी श्रद्धेय बाबूजी यांच्या प्रतिमेस हारार्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी वर्धमान जैन स्थानकचे अध्यक्ष सुभाषचंद्र सुराणा व तरुण क्रांती मंचचे निलेश सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रद्धेय बाबूजी यांनी राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले असून, मराठी पत्रकारितेलासुद्धा दिशा देण्याचे कार्य केले आहे. बाबूजी यांच्या दुरदृष्टीमुळेच लोकमत मराठी वृत्तपत्राच्या इतिहासात क्रमांक एकचे दैनिक तर महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला आहे, असे मनोगत राजेंद्र सोमाणी यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी बाबूजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
कार्यक्रमाला जिल्हा प्रतिनिधी सनत आहाळे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अभयकुमार चौधरी, वितरण विभागाचे प्रतिनिधी भाऊराव धोटे, तालुका प्रतिनिधी विश्‍वास वाल्ले, लोकमत अकोला कार्यालयाचे नवीन पाताडे, उपसंपादक संतोष वानखडे व नंदकिशोर नारे, शहर प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा, नगर प्रतिनिधी धनंजय कपाले, सहायक कार्यालय प्रमुख श्याम संगवई, कर्मचारी सुभाष सुरोशे, नितीन कदम, उमेश कैकाडी, प्रमोद तायडे, कृष्णा डावर, मुख्य वितरक राजेश संकलेचा, वितरक सुधाकर पाठक, वार्ताहर गजानन गंगावणे, श्रीकृष्ण खिल्लारे, छाया चित्रकार सुभाष जाधव उपस्थित होते.

Web Title: Gautam Buddha greetings to Jawaharlal Darda