गौरी, गणेशोत्सवात ‘सही पोषण, देश रोशन’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:30+5:302021-09-18T04:44:30+5:30
येथून जवळच असलेल्या औरंगपूर व पिंप्री मोडक येथे १ सप्टेंबर ते ३०सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत दरदिवशी पोषण ...

गौरी, गणेशोत्सवात ‘सही पोषण, देश रोशन’चा जयघोष
येथून जवळच असलेल्या औरंगपूर व पिंप्री मोडक येथे १ सप्टेंबर ते ३०सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत दरदिवशी पोषण आहाराबाबत जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबवले जात आहे. गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोषण अभियान पोहोचण्याचे काम पिंप्री मोडक येथील अंगणवाडीसेविका स्वाती क्षार व औरंगपूर येथील सेविका दीपाली भगत यांच्यामार्फत सुरू आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत दररोज ही जनजागृती केली जाणार असून, पोषण अभियान यादरम्यान गृहभेटी देणे, परसबाग तयार करणे, कुपोषित बालकांना भेटी देणे, महिला बचत गटाची सभा घेणे, सुदृढ बालक स्पर्धा घेणे, माता समितीची सभा घेणे, मुलींच्या जन्माचे वृक्षारोपण करून स्वागत करणे, गरोदर स्तनदा महिलांना समुपदेशन करणे, किशोरी मुलींना आहार व आरोग्य विषयक माहिती देणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरनाचे महत्त्व, तसेच सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याद्वारे पोषण महिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन व गृहभेटी देऊन जनजागृती सुरू राहणार असल्याची माहिती दीपाली भगत यांनी दिली आहे.