शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

माहुरवेस परिसरातून ३७ धारदार शस्त्रे हस्तगत, वाशिम शहर पोलीसांची कारवाई, एकावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 17:06 IST

वाशिम शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलिसांनी १९ तलवार

वाशिम - शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलिसांनी १९ तलवार व १८ कत्ते असे एकूण ३७ धारदार शस्त्रे हस्तगत केले. ही कारवाई १ नोव्हेंबरला सकाळी ११:३० वाजताचे सुमारास करण्यात आली.  वाशिम शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेला १९ वर्षीय बबलू गायकवाड याचे घरामध्ये अवैधरित्या धारदार शस्त्राची साठवणू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकाचे प्रमुख बी. डी. अवचार, प्रशांत अंभोरे, राजेश बायस्कर, ज्ञानदेव म्हात्रे व महिला पोलीस शिपाई मोहिनी वर्धे यांचा समावेश असलेल्या पथकाने गायकवाड याचे घरामध्ये छापा टाकुन घराची तपासणी केली. या तपासणी मध्ये गायकवाड याचे घरातील सज्जावर १९ तलवार व १८ कत्ते आढळून आले. पोलीसांनी या शस्त्रासह बबलू गायकवाड याला अटक केली.   विसर्जन मिरवणुकीत वापरतात शस्त्रे माहुरवेस परिसरातील गायकवाड याचे घरामधुन जप्त केलेली धारदार शस्त्रे ही गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी ट्रकवर लावल्या जात असल्याची माहिती आहे. बबलू गायकवाड हा एका गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष असल्याने ही शस्त्रे त्याने आपल्या घरामध्ये ठेवली होती. जप्त केलेली शस्त्रे घरामध्ये बाळगुन ठेवण्यामागे त्याचा कोणताही वाईट हेतू नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा