डोळय़ात कचरा गेला..

By Admin | Updated: May 22, 2014 23:34 IST2014-05-22T23:24:20+5:302014-05-22T23:34:10+5:30

शरीरातील एक अत्यंत नाजूक अवयव म्हणजे डोळा. त्याच्या संरक्षणासाठी निसर्गानेच त्याला काही सुरक्षाकवच प्रदान केलेली आहेत. त्यामुळे

The garbage was gone. | डोळय़ात कचरा गेला..

डोळय़ात कचरा गेला..

कारंजा : शरीरातील एक अत्यंत नाजूक अवयव म्हणजे डोळा. त्याच्या संरक्षणासाठी निसर्गानेच त्याला काही सुरक्षाकवच प्रदान केलेली आहेत. त्यामुळे डोळ्यांचा बचाव होत असतो; परंतु तरीही जर काही कारणांनी डोळ्यात कचरा गेलाच काय उपाय कराल? डोळ्यात कचरा जाणे हे धावपळीच्या युगात नित्याचीच बाब झाली आहे. विशेषत: दुचाकीवरून जाताना डोळ्यात कचरा गेल्याने अपघात घडतात. त्यावर ताबडतोब योग्य उपाय केल्यास २४ तासांत तक्रारी दूर होऊन दृष्टी पूर्ववत जागेवर येते; परंतु दुर्लक्ष, उशिरा व अघोरी किंवा घरगुती उपचार केल्यास जंतूंचा प्रादुर्भाव व जखम होऊन दृष्टीवर तात्पुरता किंवा कायमचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे. त्याबरोबर डोळ्यात खुपले, टोचले किंवा पाणी आले म्हणजे कचराच डोळ्यात असतो हा गैरसमज करू नये. कारण, इतर अनेक कारणांनी डोळ्यात खुपणे किंवा कचरा असल्याची भावना होऊ शकते. त्यामुळे अशा अचानक जाणिवेकडे दुर्लक्ष करू नये, किरकोळ म्हणून उपचारावर अवलंबून राहून गुंतागुंतीच्या आजारास सामोरे जाऊ नये. खरे म्हणजे डोळ्यांच्या शारीरिक व कार्यपद्धतीमध्ये संरक्षणाच्या अनेक सोयी-व्यवस्था निसगार्ने दिलेल्या आहेत. त्यामुळे सहजासहजी डोळ्यामध्ये धूलिकण, बाहेरचे कण किंवा कचरा डोळ्यात जात नाही. त्यामुळे असा अनुभव कधीच नसणारे अनेक लोक भेटतील. ही संरक्षणे खालील प्रमाणे आहेत. प्रतिक्षिप्त क्रिया - पापण्याच्या केसांना वारा किंवा धूळ, उष्णता किंवा थंड हवा यांचा स्पर्श होताच पापण्या मिटल्या जातात. हे सेकंदाच्या १00 व्या भागातील वेळात घडते. दुसरे डोळ्यासमोर एखादी वस्तू डोळ्याच्या दिशेने वेगाने येत असल्याचे दृश्य दृष्टीमध्ये आल्यास, पापण्या आपोआप मिटल्या जातात आणि मान, डोके किंवा पाठ पूर्ण शरीर हे येणार्‍या वस्तूपासून संरक्षणासाठी विरुद्ध दिशेस झुकते आणि येणार्‍या कणापासून किंवा वस्तूपासून डोळ्यांचे संरक्षण होते. डोळ्याची शारीरिक ठेवण डोळा हा चेहर्‍याच्या हाडाच्या खोबणीत खोल असतो. त्याच्या पृष्ठभागावर पापण्यांची शर्टस असतात व पापण्यांच्या कडांना बाह्यवक्र ४0 ते ६0 पापण्यांचे केस असतात व ते अतिशय संवेदनशील असतात. पापणी मिटल्यावर त्यावर आघात होऊनही डोळ्यास इजा होत नाही.

Web Title: The garbage was gone.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.