शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव शहरातील घंटागाड्या बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:56 IST

Malegaon News केरकचरा संकलनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : करार संपल्याने आणि विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया सुरू न झाल्याने मालेगाव शहरातील घंटागाड्या बंद झाल्या आहेत. यामुळे शहरातील केरकचरा संकलनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. शहरातील नागरिकांकडून घंटागाड्या आणि अग्निशमन कर वसूल करण्यात आला. गेल्या दीड महिन्यापासून मागील कंत्राटदाराचा कंत्राट संपल्याने काही दिवस घंटागाड्या जागेवर होत्या. त्यानंतर नगरपंचायतीने त्या गाड्या स्वत: चालविल्या. त्यामागे चालकाचा खर्च, वाहन दुरूस्ती, डिझेल, ट्रॅक्टर आदीचा खर्च होत आहे. हा पैसा जनतेकडून कररुपाने वसूल करण्यात येतो. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निविदा प्रक्रिया होऊ शकली नाही. दोन दिवस घंटागाड्या बंद होत्या.  त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरच कचरा टाकायला सुरुवात केली. नगरपंचायतीने निविदा प्रक्रिया राबवून घंटागाड्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

निवडणुक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया झाली नाही. आता लवकरच निविदा प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे. बंद असलेल्या घंटागाड्या सुरू करण्यात येतील.- सतीश शेवदाअभियंता नगर पंचायत मालेगाव

टॅग्स :washimवाशिम