रोपवाटिकेतील फळझाडांचा साकारला गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST2021-09-15T04:47:14+5:302021-09-15T04:47:14+5:30
निसर्ग शाळेच्या माध्यमातून झाडाचा गणपती ही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. पूर्वजा हिने ही झाडे वाचवा-जीवन वाचवा, ...

रोपवाटिकेतील फळझाडांचा साकारला गणपती
निसर्ग शाळेच्या माध्यमातून झाडाचा गणपती ही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. पूर्वजा हिने ही झाडे वाचवा-जीवन वाचवा, वृक्षतोड करू नका-जीवन धोक्यात टाकू नका, झाडे लावा,पर्यावरण वाचवा, मी झाडातच आहे असे संदेश देखाव्यामध्ये साकारले आहेत. तसेच अष्टविनायकांच्या नावांना आठ देशी झाडांची नावे देऊन वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे.फळझाडांसोबतच शाडूच्या गणपतीची मूर्ती देखील साकारण्यात आली आहे. गणेश मूर्तीला तिने स्वतः नैसर्गिक रंग देऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारली आहे. झाडाच्या गणपतीचे विसर्जन हे आपल्या शेतात झाडे लावून केले जाणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन, फळे, आर्थिकस्थैर्य मिळण्यास मदत होईल व तोच खरा गणपती आशीर्वाद असेल असे पूर्वजा कोकाटेने सांगितले.
पूर्वजा कोकाटेला झाडाचा गणपती साकारण्यात निसर्ग शाळेचे संस्थापक आण्णासाहेब जगताप,गजानन कोकाटे,वृक्षप्रेमी विलास कोकाटे, विश्वास कोकाटे व कोकाटे कुटुंबीयांनी मार्गदर्शन केले.