घरफोड्या करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 23, 2015 02:00 IST2015-01-23T02:00:39+5:302015-01-23T02:00:39+5:30
रिसोड व मालेगाव तालुक्यातील वाढत्या चो-यांच्या पृष्ठभूमीवर वाशिम स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई; दोन लाखाचा माल जप्त.
_ns.jpg)
घरफोड्या करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
वाशिम : रिसोड व मालेगाव तालुक्यात घरफोड्या करून धुमाकूळ माजवणार्या टोळीला दोन लाखाच्या मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रिसोड, मोठेगाव, वाकदवाडी, मांगुळ झनक व मालेगाव येथे घरफोड्या करणार्या तीन आरोपिंना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. आरोपीमध्ये विरोधी फुटबॉल पवार, बारक्या इत्तु पवार व परात्या सतार भोसले ( रा. बरटाळा ता. मेहकर) यांचा समावेश आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल व चोरीस गेलेले दोन लाख रूपये किमतीचे दागिणे जप्त करण्यात आले. या आरोपिंनी बुलडाणा, परभणी जिल्ह्यातही चोरी केल्याची कबुली दिली असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस दलाने वर्तविली आहे.