२0२ वर्षापूर्वीचे देपूळ येथील गणेश मंदिर
By Admin | Updated: September 5, 2014 23:59 IST2014-09-05T23:40:12+5:302014-09-05T23:59:36+5:30
देपूळ येथे लाकडी गणेशमुर्ती असलेले २0२ वर्षापूर्वीचे गणेश मंदिर.

२0२ वर्षापूर्वीचे देपूळ येथील गणेश मंदिर
देपूळ : येथे २0२ वर्षापूर्वीचे गणेश मंदिर आहे. लाकडी गणेश मुर्ती स्थापन केलेल्या या मंदिरात दर्शनासाठी परिसरातील भाविकांची रिघ लागलेली असते.देपूळ येथे १८१३ साली ग्रामस्थांना सुख शांती मिळावी आणि आरोग्याचे संरक्षण व्हावे तसेच सद्भावना व एकोपा निर्माण व्हावा यासाठी रामजी पाटील गंगावणे यांनी ङ्म्री गणेशाच्या लाकडी मुर्तीची स्थापना केली. विश्ोष म्हणजे त्यांच्या गढीवरील घराच्या नक्षीकामात लाकडी झालरीवरसुध्दा गणेश मुर्ती कोरलेली आहे. हे नक्षी काम चंद्रपुर येथील गोंड राजाच्या राजधानी असलेल्या किल्यावरील नक्षी कामाशी तंतोतंत जुळते त्यावरुन या मंदिराचे पुरा तत्व व गणेशाचे महत्व त्यावेळी किती होते हे दिसून येते.हे नक्षीकाम लाकडी असून २0२ वर्षा नंतर आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे देपूळ येथे गणेश उत्सव १८१३ पासून आजपावेतो निरंतर उत्सहात साजरा होतो. देपूळ येथे विठोबा रामजी गंगावणे यांच्या कारकिर्दीमध्ये वारा जहॉ. उमरा शम, काजळंबा बोरी, शेलगांव, लही, यासह पंचक्रोशीतील भाविक दिंडया घेवून दरवर्षी गणेश उत्सवात सहभागी व्हायचे. त्यावेळी दिंडीतील वारकर्यांचा सत्कार केला जात असे. या उत्सवानिमित्त कबड्डी, खो- खो चे सामने भरविल्या जात होत. गणेश उत्सवामध्ये १८ व्या शतकातही सर्वधर्म समभाव जोपासण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवामध्ये सहभागी व्हायचे . या गणेश उत्सवामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व ब्रिजलाल बियाणी , माजी आमदार शांताबाई पांगे, माजी मंत्री नानासाहेब सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब रोहणकर, माजी आमदार स्व.गजाधर राठोड, माजी आमदार डि.एस.राठोड, स्व.डवले गुरुजी या बडया व्यक्तीनी सहभाग घेतलेला आहे. गणेश भक्त स्व.नारायणराव आनंदराव गंगावणे व विश्वनाथ आनंदराव गंगावणे, काशिनाथराव आनंदराव गंगावणे यांच्या कार्यकाळामध्ये विविध क्रिडा आणि सांस्कृतीक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर कलावती नारायणराव गंगावणे, यांनी आपल्या पती नारायणराव गंगावणे यांच्या मृत्यनंतर १९५८ पासून २00६ पर्यंंंत हा उत्सव चालविला २00६ ते आज पर्यंंंत या मंदिराचे वारसदार मुरलीधर विश्वनाथ गंगावणे हे गणेश उत्सव पार पाडीत असून पुजा पातीचे व देखभाल दुरुस्तीचे काम निरंतर पाहत आहेत. या गणेश उत्सवामध्ये एक वेगळे वैशिष्टय म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलाल न उधळता गुलाब पुष्प उधळतात व मिरवणुक मुर्ती डोक्यावर घेवून टाळमृदंगाच्या निनादात काढली जाते हे विशेष.