गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात राहणार तगडा बंदोबस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:40 IST2017-09-04T01:40:22+5:302017-09-04T01:40:33+5:30
वाशिम: जिल्हय़ात मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोमवार पासूनच ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात राहणार तगडा बंदोबस्त!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हय़ात मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोमवार पासूनच ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली.
जिल्हय़ात यंदा शहरी भागात २४५; तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरित ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची स् थापना झाली आहे. तथापि, मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवशी ‘श्रीं’ना निरोप दिला जाणार असून, यानिमित्त काढल्या जाणार्या मिरवणुकांमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्हय़ातील महत्त्वाच्या शहरा तील विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचे सनियंत्रण पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक यांच्या दालनातून केले जाणार आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यावर पूर्णत: बंदी लादण्यात आली असून, नियमाचा भंग करणारे गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसह डीजे मालकावरही कारवाई केली जाणार आहे.
मद्यविक्री करणे, जवळ बाळगणे यावरदेखील पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार असून, विक्रेते तसेच मद्यपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी श्वास चाचणीमापक यंत्रे बंदोबस्तावरील अधिकारी, कर्मचार्यांकडे देण्यात आली आहेत. मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील याच्या अधिपत्याखाली अप्पर पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, २५ पोलीस निरीक्षक, ७0 सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक १0३२ पोलीस कर्मचारी, ४00 होमगार्ड, एक एसआरपीफ कंपनी, दोन दंगा नियंत्रक पथक व एक अतिजलद प्र ितसाद पथक आवश्यक त्या सर्व शस्त्रास्त्र व साहित्यानिशी बंदोबस्तासाठी तयार करण्यात आले आहे. हा बंदोबस्त ४ सप्टेंबरपासूनच तैनात केला जाणार असल्याचे मोक्षदा पाटील यांनी सांगितले. तथापि, यावर्षी बंदोबस्तावर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे वेगळया पद्धतीने कर्तव्य बजावताना दिसून येतील. त्यामुळे कुणीही कायदा व नियमांचे उल्लंघन न करता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे.