मैराळडोहवासियांचा वाड्यातील गणपती
By Admin | Updated: September 3, 2014 21:13 IST2014-09-03T21:13:06+5:302014-09-03T21:13:28+5:30
मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथे सलग पाचपीढय़ांपासून सुरू असलेला गणेशोत्सव.

मैराळडोहवासियांचा वाड्यातील गणपती
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा नजिक असलेल्या मैराळडोह येथील पुरातन काळापासून मातीच्या गणेश मुर्तीची स्थापना केलेली आहे. ही परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरू असून पाच पिढयांपूर्वीचा हा उत्सव असल्याचे सांगण्यात येत आहे. मैराळडोहवासियांचे ङ्म्रध्दास्थान असलेला हा गणपती वाड्यातील गणपती म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे.
दरवर्षी परंपरेनुसार चंदुराव घुगे यांच्या पाचव्या पिढीतही त्या मातीच्या गणेशाची रंगरंगोटी करून दरवर्षी येथे गणेशोत्सव चालत आला आहे. येथे तेव्हा पासून तर आजतागायत हा उत्सव पार पाडल्या जात आहे. येथे गणेशाच्या स्थापनेपासून तर आजतागायत राम विजय ग्रंथांचे पोथी वाचन व विविध कार्यक्रम पार पडत आहेत. या उत्सवाला शेकडो वर्ष पूर्ण झाल्याचे गावातील नागरिक सांगत असून जुने जाणते आज नसल्याने नेमके किती वर्ष झाले हे जरी सांगता येत नसले तरी येथे गणेशोत्सव कार्यक्रम पाच पिढयांपासून सुरू असल्याचे चंदुराव घुगे यांनी सांगितले. सद्या चंदुराव घुगे व वाडेकर गणेश मंडळ याचा कारभार पाहत असून अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा कायम ठेवून आहेत.