हिंगोली नाक्यावरील अतिक्रमणावर गजराज

By Admin | Updated: February 27, 2016 01:29 IST2016-02-27T01:29:17+5:302016-02-27T01:29:17+5:30

वाशिम जिल्हाधिका-यांच्या पथकाचा पुढाकार.

Gajraj on the encroachment on Hingoli Naka | हिंगोली नाक्यावरील अतिक्रमणावर गजराज

हिंगोली नाक्यावरील अतिक्रमणावर गजराज

वाशिम: शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू झाली. १५ दिवसानंतर या मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात शुक्रवारी स्थानिक हिंगोली नाक्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. वाशिम शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शहराला अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाने आपल्या कवेत घेतले आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम या दोन बाबीमुळे शहराचे सौंदर्य लोप पावत असल्याच्या पृष्ठभूमीवर काही नागरिकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी वाशिम शहरातील पाटणी चौकात ट्रकने एका इसमाला चिरडल्याने वाहतूक व्यवस्थेचे पितळ उघडे पडले होते. अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेत व्यत्यय निर्माण होत असल्याचे पाहून अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. पहिल्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अकोला नाका, पोस्ट ऑफिस चौक परिसरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण व अतिक्रमित खोके हटविले होते. तिसर्‍या टप्प्यात नगर परिषदेच्या चमूने स्थानिक हिंगोली नाका परिसरातील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविले. काही महिन्यांपूर्वी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती; मात्र परत ह्यजैसे थेह्ण परिस्थिती झाली होती. १५ दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व पोस्ट ऑफिस चौकातील अतिक्रमण हटविले होते. रस्त्यालगत अतिक्रमण झाल्याचे दिसून येते.

Web Title: Gajraj on the encroachment on Hingoli Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.