वाशिम जिल्ह्यात ‘गजानना’च्या नामाचा गजर

By Admin | Updated: February 12, 2015 00:54 IST2015-02-12T00:54:25+5:302015-02-12T00:54:25+5:30

विविध ठिकाणी महाप्रसाद; लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन.

Gajnaana alarm in Washim district | वाशिम जिल्ह्यात ‘गजानना’च्या नामाचा गजर

वाशिम जिल्ह्यात ‘गजानना’च्या नामाचा गजर

वाशिम : जिल्हय़ातील श्री गजानन महाराज मंदिरावर आज ११ फेब्रुवारी रोजी श्रींच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. शहरासह ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात ङ्म्रींचा गजर होता. विविध ठिकाणी आज महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हय़ातील प्रति शेगाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या रिठद येथे सकाळपासूनच भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. वाशिम शहरातील अनेक भाविकांनी पायदळ रिठद येथे जाऊन ङ्म्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. वाशिम शहरातील आययूडीपीस्थित व देवपेठस्थित ङ्म्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांनी व भाविकांच्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रत्येक संस्थानवर ५ क्विंटलपासून तर १२१ क्विंटलपर्यंतच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हय़ातील प्रसिद्ध मंदिरे रिठद, वाशिम, बिटोडा भोयर, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, कार्ली गुंज, देपूळ, वाकद येथे ङ्म्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वाशिम येथील आययूडीपीस्थित ङ्म्री संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच देवपेठ येथील ङ्म्री गजानन महाराज संस्थान समितीने तर प्रसादाची पाकिटे तयार करून भाविकांना वाटप केले. त्याशिवाय पंगतीद्वारेही भोजन देण्यात आले. काही ठिकाणी गजानन महाराजांचे आवडते खाद्य पदार्थ कांदा, बेसन व भाकरीच्या प्रसादाचेही आयोजन केले होते. कारंजा शहरातील पोलीस स्टेशन परिसर, बायपासवरील ममतानगर, सातपुते ले-आऊट, बाबरे कॉलनी, सुंदरवाटिका, प्रोफेसर कॉलनी, लोकमान्य नगर व महावीर कॉलनीत श्रींच्या सार्वजनिक मंदिरावर आज मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. वाशिम शहरातील शिवाजी नगरामध्ये नव्यानेच गजानन महाराज मंदिर उभारण्यात आले असून, या मंदिरावरही आज परिसरातील भाविकांनी गर्दी केली.

Web Title: Gajnaana alarm in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.