पाणीटंचाईच्या प्रश्नावर गाजली कारंजा पंचायत समितीची सभा
By Admin | Updated: November 16, 2014 01:53 IST2014-11-16T01:30:17+5:302014-11-16T01:53:16+5:30
आ.पाटणी यांनी अधिका-यांकडून मागविला अहवाल.

पाणीटंचाईच्या प्रश्नावर गाजली कारंजा पंचायत समितीची सभा
कारंजा लाड (वाशिम): यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस कोसळला नसल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. या संकटाच्या निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आलेली आढावा सभा चांगलीच गाजली. या प्रसंगी आ. राजेंद्र पाटणी यांनी तालुक्याच्या गावागावातील पाणीटंचाई व इतर समस्या प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात व आगामी आठ दिवसात पाणीटंचाईबाबत तालुक्याची काय परिस्थिती आहे याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांना दिले. तसेच महाराष्ट्र रोजगार हमी योजना या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन ग्रामसेवक उपाध्ये, तर आभार कृषी अधिकारी पी.एस. देशमुख यांनी केले. आढावा सभेला उपविभागीय महसूल अधिकारी दिनकर काळे, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, गटविकास अधिकारी पवार, जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, बेबीताई चव्हाण, सभापती वर्षाताई नितीन नेमाने, मानोरा तहसीलदार पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.