शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोरोनाच्या परिस्थितीवर जिल्हा कृषी महोत्सवांचे भवितव्य अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 16:43 IST

कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

वाशिम : शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करणे, ग्राहक ते शेतकरी थेट शेतमाल विक्रीची जोड घालणे आदी उद्देशाने दरवर्षी राज्यात जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास हा महोत्सव घेण्यात यावा अन्यथा २०२१-२२ मध्ये आयोजन करावे, अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने १६ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या.बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देणे, प्रयोगशील व प्रगतशील शेतकºयांच्या माध्यमातून इतर शेतकºयांना विचाराची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देणे, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संधी आदी उद्देशातून सन २०१७ पासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद, प्रगतशील शेतकरी किंवा उद्योजकांची व्याख्याने, धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव आदींचे आयोजन करण्यात येते. परंतू, यंदा कोरोनाचे सावट असल्याने आणि कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कृषी विभागाने जिल्हा कृषी महोत्सवासंदर्भात जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास सन २०२०-२१ या वर्षात कृषी महोत्सव घेण्यात यावा अन्यथा पुढील आर्थिक वर्षात अर्थात २०२१-२२ मध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करावे, अशा सूचना कृषी विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १६ आॅक्टोबरला दिल्या. त्यानुसार वाशिमसह अमरावती विभागात चालू आर्थिक वर्षात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर कृषी महोत्सव होईल अन्यथा यंदाचा कृषी महोत्सव रद्दही होऊ शकतो, असा अंदाज कृषी विभागातून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र