‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धार ठरला ‘फुसका बार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:55 IST2017-07-26T01:54:05+5:302017-07-26T01:55:41+5:30

‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धार ठरला ‘फुसका बार’!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यासोबतच ‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धारही करण्यात आला होता; परंतू प्रभावी जनजागृती अभाव आणि पुरेशा प्रमाणात ‘पॉस’ यंत्रांचा पुरवठा झाला नसल्याने हा निर्धार निव्वळ ‘फुसका बार’ ठरल्याचे दिसून येत आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासोबतच बाजारपेठेत ‘कॅशलेस’ व्यवहाराला चालना मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१६ पासून फेब्रूवारी २०१७ पर्यंत तीन महिने यासंबंधी युद्धस्तरावर जनजागृती केली. जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम या दोन मोठ्या शहरांमधील बाजारपेठेत ‘कॅशलेस झोन’ उभारण्याचा निर्णय देखील याचदरम्यान घेण्यात आला. मात्र, त्यासाठी लागणाºया ‘पॉस मशीन’ बँकांकडून उपलब्ध करून देण्याकामी प्रचंड दिरंगाई बाळगल्या गेल्याने ‘कॅशलेस’चा गाजावाजा पूर्णत: निरर्थक ठरला आहे.
तथापि, रोखीने होणाºया व्यवहारांवर आळा घालून संपूर्ण जिल्हा ‘कॅशलेस’ करायचा असेल तर सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये प्रती तालुका किमान २ हजार, यानुसार १२ हजार ‘पॉस मशीन’ उपलब्ध होऊन त्या कार्यान्वित होणे गरजेचे आहे. असे असताना आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ५०० ‘मशीन’ही कार्यान्वित झाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे व्यापाºयांमधून ‘कॅशलेस’ व्यवहारांसंबंधी दृढ इच्छाशक्ती असतानाही त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अशक्य ठरले आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात पुन्हा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून कॅशलेस व्यवहारांची अंमलबजावणी करण्यास व्यावसायिकांना प्रेरित केले जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.