‘त्या’ मुलींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: January 17, 2015 00:42 IST2015-01-17T00:42:30+5:302015-01-17T00:42:30+5:30

विहीरीमध्ये बुडून मृत्यू पावलेल्या मुलींच्या पार्थिवावर अंतसंस्कार.

Funeral on 'those girls' part | ‘त्या’ मुलींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

‘त्या’ मुलींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

रिसोड (जि. वाशिम): संक्रातीनिमित्त १४ जानेवारी रोजी दुपारी शेतामध्ये गावातील दोन मुली बोरं आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या मुलींचा मृतदेह १५ जानेवारीला एका विहीरीमध्ये आढळून आला शवचिकित्सेनंतर या मुलींच्या पार्थिवावर त्याच रात्री १ वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. रिसोड शहराजवळ असलेल्या सवड येथील १५ वर्षीय अंजली ज्ञानबा जाधव व अनिल दत्तराव सोनुने यांची १२ वर्षीय भाची वृषाली मारोतराव काळे या दोघी १४ जानेवारी रोजी दुपारच्यावेळी मकरसंक्रात सणासाठी शेतात बोरे आणण्याकरिता गेल्या होत्या. परंतु त्या रात्री उशिरापर्यंत घरी न पोहचल्याने त्यांचा शोध घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी संतोष सुर्यभान मंडलीक याला अटक केली. १५ जानेवारी रोजी सकाळी दोन्ही मुलींचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मात्र रिसोड येथे महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने दोन्ही मुलींची शवचिकित्सा करण्यासाठी त्यांचा मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आला होता. रात्री दोन्ही मुलींचा मृतदेह सवड येथे आणण्यात आला. त्यानंतर रात्री १ वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कर करण्यात आला. यामधील आरोपिस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर शवचिकित्सा अहवाल प्राप्त न झाल्याने मुलींचा मृत्यू कशाने झाले कळू शकले नाही.

Web Title: Funeral on 'those girls' part