जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 04:50 PM2020-01-17T16:50:42+5:302020-01-17T16:50:47+5:30

‘अमर रहें, अमर रहें, तस्लीम भाई अमर रहें’च्या घोषणांच्या निनादात  या वीरास निरोप देण्यात आला.

Funeral of Jawan Taslim Munniwale in Government Etiquette | जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
 कारंजा लाड :   केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) जवान तस्लीम सलीम मुन्नीवाले यांच्यावर शुक्रवारी (१७ जानेवारी) रोजी येथील बायपास जवळच्या मुस्लिम कब्रिस्थान येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रशासनाच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता. ‘अमर रहें, अमर रहें, तस्लीम भाई अमर रहें’च्या घोषणांच्या निनादात  या वीरास निरोप देण्यात आला.
        येथील गवळीपूरा मधील मूळ रहिवासी तस्लीम मुन्नीवाले हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) मध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना मंगळवार, १४ जानेवारी रोजी सहकारी कर्मचाºयाने गोळी झाडून त्याची हत्या केली होती. सेवा बाजावतांना मृत्यू झाल्याची बातमी मिळाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली होती. मागील दोन दिवसांपासून सर्व तरुण मंडळी सर्व व्यवहार बंद ठेवून अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. जम्मू काश्मीर येथून १६ जानेवारीच्या रात्री विमानाने जवान तस्लीम चे पार्थिव नागपुरात दाखल झाले. त्यानंतर अमरावती मार्गे पार्थिव कारंजा आणण्यात आले. सर्वप्रथम मुन्नीवाले कुटुंबियांच्या घरी पार्थिव काही वेळ ठेवण्यात आले. त्य नंतर मुस्लिम विधीनुसार नमाजे जनाजा अदा करण्यात आली. तसेच अंतिम दर्शनकरिता कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवरामध्ये पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये अंतीम यात्रा काढण्यात आली. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) व जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. नागरिकांनी स्वयंफुतीर्ने आपली प्रतिष्ठाने तसेच सर्व व्यवहार बंद ठेऊन यात्रेत सहभाग नोंदवला.  नगरपालिकेची सर्व शाळांना बंद ठेवण्यात आली होती.नागरिकांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली. या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटणी, काँग्रेस नेते मो.युसूफ पुंजानी, नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाड़े,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, नायब तहसीलदार विनोद हरणे,ठाणेदार एस.एम.जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदराजंली वाहिली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. जवान तस्लीम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वधर्मीय हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते.

Web Title: Funeral of Jawan Taslim Munniwale in Government Etiquette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.