शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धर्मगुरू रामराव महाराज यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 17:28 IST

Sant Ramrao Maharaj News रविवार १ नोव्हेंबर रोजी बंजारा काशी पोहरादेवी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मानोरा (वाशिम) : संत सेवालाल महाराज यांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे लिलावती रुग्णालय मुंबई येथे शुक्रवारी रात्रीदरम्यान देहावसान झाले असून, रविवार १ नोव्हेंबर रोजी बंजारा काशी पोहरादेवी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.गुरुपौर्णिमेला ७ जुलै १९३५ रोजी जन्मलेल्या रामराव महाराजांनी कोजागिरी पौर्णिमेला रात्री ११ वाजतादरम्यान मुंबई येथील लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. महाराजांचा ओढा बालपणापासूनच अध्यात्म, मानव कल्याणाकडे असल्यामुळे आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन डॉ. रामराव महाराज यांनी केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील आदिशक्ती माता जगदंबा तथा क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांचे पुजारी व मठाधिपती म्हणून संपूर्ण भारत आणि विदेशातही रामराव महाराजांना मान्यता होती. मागील एका वर्षापासून प्रकृती अस्थिर असतानाही बंजारा समाजाचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी आजारी अवस्थेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट यावर्षी मार्च महिन्यात घेतली होती. दरम्यान, संत रामराव महाराज यांचे पार्थिव शनिवारी रात्री पोहरादेवी येथे येत असून, रविवारी पोहरादेवी येथे त्यांच्यावर दुपारी १२.३० वाजतादरम्यान अंतिम संस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी कुटुंबाकडून तसेच भाविकांकडून पूजाआरती होणार आहे. दरम्यान पोहरादेवीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासन तेथे तळ ठोकून आहे. गर्दी टाळण्यासाठी पाेलीसांच्यावतिने पाेहरादेवीमध्ये नाकाबंदी सुध्दा करण्यात आली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या शोक संवेदनाधर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

टॅग्स :washimवाशिम