शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

साखरा आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री संजय राठोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:19 IST

वाशिम : साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत उभारणी, शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती आणि शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत उभारणी, शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती आणि शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सोमवारी शाळेत पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, नगराध्यक्ष अशोक हेडा, शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, डी.ए. तुमराम, चंद्रकला इंगळे, उपसरपंच द्वारकाबाई राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले, दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शाळेमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध होणार आहे. राज्यात केवळ १२ आंतरराष्ट्रीय शाळांना मान्यता मिळाली असून त्यामध्ये साखरा येथील शाळेचा समावेश आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पाच हजार विद्यार्थी क्षमतेच्या या शाळेचे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्याचे सूक्ष्म नियोजन करावे. शाळेच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक राजूभाऊ महाले यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमSanjay Rathodसंजय राठोडSchoolशाळा