सात गावासाठी तांडा सुधार योजनेचा निधी मंजूर
By Admin | Updated: September 10, 2014 00:33 IST2014-09-10T00:33:58+5:302014-09-10T00:33:58+5:30
मंगरूळपीर पंचायत समितीमधील सात गावांना तांडा सुधार योजने अंतर्गत रस्ते मंजूर.

सात गावासाठी तांडा सुधार योजनेचा निधी मंजूर
मंगरूळपीर: पंचायत समितीमधील सात गावांना तांडा सुधार योजने अंतर्गत पाच लाख किंमतीचे सिमेंट रस्ते मंजूर झाल्याची माहिती मंगरूळपीर पंचायत समिती सभापती भास्कर पाटील शेगीकर यांनी दिली.
यावर्षी मंगरूळपीर पंचायत समिती मधील चेहेल, गोलवाडी, निंबी, चोरद, गोगरी, कंझरा, भडकुंभा या गावाला सिमेंट रस्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येकी पाच लाखाचा निधी मंजूर झाल्याचे सभापती भास्कर पाटील यांनी सांगितले.