रिसोड नगरपालिकेला दोन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:15 IST2021-08-02T04:15:35+5:302021-08-02T04:15:35+5:30
राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत आमदार बाजोरिया यांच्या विकास निधीमधून रिसोड नगरपरिषदेला भरीव ...

रिसोड नगरपालिकेला दोन कोटींचा निधी
राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत आमदार बाजोरिया यांच्या विकास निधीमधून रिसोड नगरपरिषदेला भरीव निधी प्राप्त झाला. मागील काही दिवसांपासून शहरातील काही विकासकामे निधीअभावी रखडली होती. नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी निधी मिळण्यासंबंधी वारंवार मागणी व पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेत आमदार बाजोरिया यांनी निधी प्राप्त करून दिला.
हा निधी नगरपरिषदेच्या सर्व प्रभागांमध्ये समप्रमाणात खर्च केला जाणार आहे. नाली बांधकाम, काँक्रीट रस्त्यांची कामे त्यातून पूर्ण केली जाणार आहेत. ३१ मार्च २०२२ पूर्वी निधी खर्च करणे बंधनकारक आहे.
...............
कोट :
रिसोड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे विकासकामांसाठी निधीची मागणी केली. त्यांनीही निधी मंजूर करून दिला. त्यातून विविध ठिकाणच्या विकासकामांना गती देण्यात येईल.
- विजयमाला आसनकर
नगराध्यक्ष, रिसोड