गोठय़ाला आग; दीड लाखाचे नुकसान!

By Admin | Updated: November 8, 2016 02:07 IST2016-11-08T02:07:23+5:302016-11-08T02:07:23+5:30

ग्राम तपोवन येथील घटना; शॉर्टसर्किटमुळे घडला प्रकार.

Frozen fire; Half of loss! | गोठय़ाला आग; दीड लाखाचे नुकसान!

गोठय़ाला आग; दीड लाखाचे नुकसान!

शेलूबाजार (वाशिम), दि. ७- येथून जवळच असलेल्या ग्राम तपोवन येथे ७ नोव्हेंबरच्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे बैलाच्या गोठय़ाला लागलेल्या आगीत ४ शेतकर्‍यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले.
तपोवन येथे सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत मदन नामदेव येवले, भाष्कर शामराव येवले, शेषराव वानखडे आणि संजय तुकाराम येवले यांच्या गोठय़ातील विद्यूत मीटर, चक्की, धान्य आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यावेळी नागरिकांनी मोटारपंपाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंगरूळपीर नगर परिषदेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. दोन तासानंतर सदर आग आटोक्यात आली; मात्र तत्पूर्वी सुमारे दीड लाख रुपयाचे साहित्य जळून खाक झाले होते.

Web Title: Frozen fire; Half of loss!