१६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्संना मिळणार काेराेना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST2021-01-13T05:46:11+5:302021-01-13T05:46:11+5:30
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात ...

१६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्संना मिळणार काेराेना लस
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत होते. कोरोना लस उपलब्ध झाली असून, १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सरकारी व खासगी क्षेत्रातील ५५०० वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूक्ष्म नियोजन व डाटा अपलोड केला आहे. कोरोना लसीकरणाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, कोविड ॲपमध्ये सर्वांची एन्ट्री केली आहे.
००००
लसीकरण कोणाला व कधी?
पहिल्या टप्प्यात सुरुवातीला सरकारी डाॅक्टर, कर्मचारी, खासगी डाॅक्टर व कर्मचारी या फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात येणार आहे. कोविड ॲपमध्ये नोंदणी झालेली असून, मोबाइलवर संदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना संबंधित केंद्रात जावे लागणार आहे.
००
फ्रंटलाइन वर्कर्सना पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आलेली असून, संबंधितांनी नोंदणीदेखील केली आहे.
- डाॅ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक
०००