रोहित्रांत वारंवार बिघाड ; वीजपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST2021-08-12T04:46:41+5:302021-08-12T04:46:41+5:30
वाशिम : गेल्या काही दिवसांत पावसाची सतत रिपरिप सुरू असल्याने रोहित्रात बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. नादुरुस्त रोहित्र दुरुस्त ...

रोहित्रांत वारंवार बिघाड ; वीजपुरवठा विस्कळीत
वाशिम : गेल्या काही दिवसांत पावसाची सतत रिपरिप सुरू असल्याने रोहित्रात बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे. त्यात आठवडाभरात नादुरुस्त झालेल्या ३१ रोहित्रांपैकी २८ रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहेत.
पावसाने सतत रिपरिप लावल्यामुळे वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेकदा रात्र अंधारात काढावी लागत आहे. शिवाय इतरही अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे महावितरणकडून रोहित्र तातडीने दुरुस्त करण्याची धडपड दर दिवशी पाहायला मिळत आहे. गत १५ दिवसांत जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक रोहित्र बिघाडामुळे बंद पडले. त्यात आठवडा भरात नादुरुस्त झालेल्या ३१ रोहित्रांपैकी २८ रोहित्र महावितरणकडून दुरुस्त करण्यात आले.
----------
ग्रामस्थांनाही आला वैताग
गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुुरू असताना अचानक रोहित्रात बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रात्री विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून नादुरुस्त रोहित्र तातडीने दुरुस्त करण्याचे किंवा ते बदलण्याचे कार्य केले जात असले तरी वारंवार होत असलेल्या बिघाडाचे ग्रामस्थांना पार वैताग आला आहे.