कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोना संसर्ग ओसरल्याने बसेस पूर्ववत झाल्या आहेत. लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातही बहुतांश बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे; परंतु आजही काही फुकटे प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अंकुश बसविण्यासाठी एसटी महामंडळाने लक्ष्य केंद्रित केले आहे. एसटी महामंडळाची पथके जिल्हाभर तैनात करण्यात आली असून, कुठेही बसची तपासणी करण्यात येईल. २२ सप्टेंबरपासून बसेसची अशी तपासणी करण्यात येत आहे.
००००
कुठेही, केव्हाही होऊ शकते तपासणी
जिल्ह्यात कुठेही आणि केव्हाही बसेसची तपासणी होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करताना आपले तिकीट प्रवास होईपर्यंत जपून ठेवणे आवश्यक झाले आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम ६ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
०००००
प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंड
मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सध्या एसटी महामंडळाच्या पथकांकडून जिल्ह्यातील बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवाशांना दंड करण्याची मोहीम सुरू झालेली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येत आहे.
तपासणी अधिकारी यांना बस तपासणीच्या वेळी प्रवाशांनी प्रवास केलेल्या मार्गाचे तिकीट दाखविणे आवश्यक आहे.
०००००००
जिल्ह्यातील आगार -०४
००००
अशी आहेत पथके
थांबा, बसस्थानक,
०४
००००००००००
मार्गावरील पथके
वाहतूक नियंत्रक ०१
एकूण पथके -०४
तपासणी अधिकारी - ००
००००००००००
वाहतूक नियंत्रकाचा कोट
कोट : एसटी बसने विनातिकीट प्रवास करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने प्रवास करताना सुरुवातीला आपले तिकीट घेणे आवश्यक आहे. ते पूर्ण प्रवास होईपर्यंत स्वत:जवळ सुरक्षित ठेवावे. प्रवाशांसह वाहकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या बसमध्ये किती प्रवासी आहेत, किती प्रवाशांनी तिकीट काढले हे तपासणी करणे आवश्यक आहे.
- योगेश ठाकरे, वाहतूक नियंत्रक, वाशिम
००००००
२) दंडाचे प्रमाण कळणार मोहिमेच्या अंती (बॉक्स)
एसटी महामंडळाने फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. एसटी महामंडळाच्या पथकाकडून दिवसाला १०० बसेसची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विनातिकीट करताना आढळलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल कला जात असला तरी वाशिम जिल्ह्यात नेमका िकिती प्रवाशांकडून किती दंड वसूल झाला. त्याचे प्रमाण मोहीम संपल्यानंतरच कळू शकणार आहे.