रस्त्यासाठी आमरण उपोषणाचा चौथा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:19+5:302021-02-05T09:22:19+5:30
या उपाेषणाला व्यापारी मंडळ, डॉक्टर असोसिएशन, हिंदवी स्वराज संघ, मॉर्निंग क्लब रिसोड, मेडिसिन असोसिएशन, ऑटो युनियन, राजकीय मंडळी, सामाजिक ...

रस्त्यासाठी आमरण उपोषणाचा चौथा दिवस
या उपाेषणाला व्यापारी मंडळ, डॉक्टर असोसिएशन, हिंदवी स्वराज संघ, मॉर्निंग क्लब रिसोड, मेडिसिन असोसिएशन, ऑटो युनियन, राजकीय मंडळी, सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दर्शविला आहे. रिसोड येथील अनंता देशमुख यांनी २७ जानेवारीपासून रस्त्यासाठी भररस्त्यावर उपोषणा सुरू केले आहे, तरीही प्रशासन याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. सदर रस्त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहे. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे. सदर रस्त्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर आहेत, टेंडर नोटीसची प्रक्रिया बाकी आहे. लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे अमरण उपोषण सुरू राहणार, अशी माहिती उपाेषणकर्ते यांनी दिली. २९ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, तसेच तहसीलदार ठाणेदार यांनी उपोषण मंडपास भेट देऊन समजूत काढण्याचे प्रयत्न केले, पण लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे नाही, असा उपोषणकर्त्याच्या मत आहे.