चारचाकी वाहनाने मुलास उडविले!

By Admin | Updated: September 14, 2016 02:17 IST2016-09-14T02:17:40+5:302016-09-14T02:17:40+5:30

मानोरा येथील घटना; चिमुकला गंभीर.

Four-wheeled vehicle flew away! | चारचाकी वाहनाने मुलास उडविले!

चारचाकी वाहनाने मुलास उडविले!

मानोरा(जि. वाशिम) : शहरातील नाईकनगरकडे जाणार्‍या वळण रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने सायकलने घरी चाललेल्या १४ वर्षीय चिमुकल्यास उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारास्तव त्यास यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. ही घटना १३ सप्टेंबर रोजी ३ वाजताच्या सुमारास घडली. शहरातील नाईक नगर येथे खोली भाड्याने करून आजी-आजोबांसोबत वास्तव्याला असलेला आशिष माळवे हा मुलगा मूळचा ग्राम गोरेगाव येथील आहे. १३ सप्टेंबरला प्रेसचे कपडे घेण्यासाठी तो शहरातील नाईकनगरकडे जाणार्‍या वळण रस्त्यावरील लॉन्ड्रीवर आला होता. यादरम्यान सायकलने घरी जात असताना दिग्रस चौकातून नाईक नगरकडे येणार्‍या महिंद्रा पीकअप (क्रमांक एम.एच.२९ टी. ४७२२) या चारचाकी वाहनाने त्यास जबर धडक दिली. यात आशिषच्या डोक्याला व पाठीच्या कणाला जबर मार लागला. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचाराकरिता यवतमाळला पाठविण्यात आले.

Web Title: Four-wheeled vehicle flew away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.