हत्या प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: October 15, 2014 01:03 IST2014-10-15T01:03:00+5:302014-10-15T01:03:00+5:30

रिसोड तालुक्यातील इसमाची हत्या, न्यायालयीन कोठडीत रवानगी.

Four prisoners in judicial custody | हत्या प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी

हत्या प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी

शिरपूरजैन (रिसोड, जि. वाशिम) : कोयाळी खुर्द येथे शिलींग जमिनीच्या वादावरुन नामदेव दस्तुजी गव्हाणे या ६५ वर्षीय इसमाची हत्या झाल्याप्रकरणी अटकेतील चौघांना एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिशांनी १४ ऑक्टोबर रोजी दिले.
१२ ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली होती. गव्हाणे यांना मिळालेल्या शिलींग जमिनीबाबत काही वर्षापासून गावातील संजय बोरकर यांच्याशी त्यांचा वाद सुरु होता. या प्रकरणी मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरुन शिरपूर पोलिसांनी भादंविच्या ३0२, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करुन संजय बोरकर, नरहरी बोरकर, केशव बोरकर, मारोती लादे यांना अटक केली होती. तर रवी बोरकर व राजू बोरकर हे दोघे अद्यापही फरार आहेत. अटकेतील चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यांना सुरुवातीला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्या चौघांना १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी चौघांनाही न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले.

Web Title: Four prisoners in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.