वादळी वाऱ्यामुळे चार लाखांच्या पपईचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:15+5:302021-03-22T04:37:15+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यायासह पावसामुळे तालुक्यातील ग्राम तांदळी येथील पपई पिकाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले ...

वादळी वाऱ्यामुळे चार लाखांच्या पपईचे नुकसान
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यायासह पावसामुळे तालुक्यातील ग्राम तांदळी येथील पपई पिकाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारंजा येथील शेतकरी राजेश हवा यांची शेती तांदळी शेत शिवारात आहे. त्यांनी यावर्षी सात एकर शेतात पपई पिकाची लागवड केली होती. मात्र, २० मार्च रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पपईची झाडे पूर्ण तुटून पडली. तसेच झाडाला लागलेल्या पपई फळाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे राजेश हवा यांचे जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. आतापर्यंत कोणीही पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे कर्मचारी आले नाही.