चार लाख दस्तांचे स्कॅनिंग
By Admin | Updated: February 14, 2015 02:04 IST2015-02-14T02:04:41+5:302015-02-14T02:04:41+5:30
पहिल्या टप्प्यात चार तहसीलचा समावेश; रिसोड तहसील पूर्वतयारीत.

चार लाख दस्तांचे स्कॅनिंग
वाशिम : महत्त्वाच्या फाईल, कागदपत्रांचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागातर्फे सुरू असलेल्या ह्यस्कॅनिंगह्ण मोहिमेला कुठे गती तर कुठे उदासिनता असल्याचे वास्तव समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास १९ लाख २५ हजार दस्तऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत (दि.१३) चार लाख ३0 हजार दस्तऐवज स्कॅन झाल्याची माहिती आहे.
तहसील कार्यालयांमधील रेकॉर्ड रुममध्ये असलेल्या दस्तऐवजांचे जतन करण्यासाठी ह्यस्कॅनिंगह्ण मोहीम सुरू आहे. शेतीसंबंधीची कागदपत्रे, जन्म-मुत्यूच्या नोंदीची कागदपत्रे, कोतवाल बुकाची नक्कल, पेरेपत्रक यासह विविध प्रकारचे दस्तऐवज वर्षानुवर्षे सांभाळण्याची जबाबदारी तहसील विभागावर सोपविण्यात आली आहे. या दस्तऐवजांचे कायमस्वरुपी जतन करण्यासाठी दस्तऐवज स्कॅन करण्याचे काम तहसील स्तरावर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव व मंगरुळपीर या चार तहसील कार्यालयांमधील दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. रिसोड तहसील कार्यालयाचा अपवाद वगळता उर्वरित तीनही तहसील कार्यालयाने दस्तऐवजांचे स्कॅनिंग करणे सुरू केले आहे. यामध्ये सर्वाधिक आघाडी वाशिम तहसील कार्यालयाने तर मालेगाव तहसील पिछाडीवर असल्याचे दिसून येते. वाशिम तहसील कार्यालयाने अडीच लाखाच्या वर तर मालेगाव तहसीलने ८0 हजाराच्या आसपास दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले आहे. रिसोड तहसील कार्यालय व भूमिअभिलेख कार्यालय संयुक्तरीत्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग करणार आहे. सुरूवातीला भूमिअभिलेख कार्यालयात स्कॅनिंग मोहीम सुरू आहे. त्यानंतर तहसील कार्यालयातील दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. पुर्वतयारी झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.