शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा उपजिल्हा रुग्णालयात चार डॉक्टर आढळले गैरहजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:49 IST

गैरहजर राहणाºया डॉक्टरांवर कारवाई करावी असा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे १९ सप्टेंबर रोजी सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड (वाशिम) : तहसिलदार व नगर परिषदेच्या अधिकाºयांनी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान केलेल्या पाहणीत कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील चार वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) गैरहजर आढळून आले. तहसिलदार धीरज मांजरे यांनी यासंदर्भातचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, यावर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे. कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयात धाव घेत मृतकाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मृतदेह ताब्यात घेत नसल्याच्या माहितीवरून तहसिलदार धीरज मांजरे, नगर परिषदेचे अधिकारी स्वप्नील खामकर यांनी शनिवारी उपजिल्हा रुग्णालय गाठून नातेवाईकांची समजूत काढली. यावेळी मांजरे यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ भाऊसाहेब लहाने यांना सर्व वैद्यकीय अधिकाºयांची बैठक तातडीने आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठक घेण्यात आली. त्यानुसार डॉ जयंत पाटील हे १४  सप्टेंबरपासून, डॉ. दयाराम चव्हाण व डॉ. पूजा गजरे हे १८ सप्टेंबरपासून गैरहजर तर डॉ मधुकर मडावी हे १९ सप्टेंबर रोजी गैरहजर असल्याचे आढळून आले. ४ महत्वाचे डॉक्टर हे विनापरवानगी गैरहजर आढळून आले.  त्यामुळे ते बैठकीला येऊ शकले नाही, असे वैद्यकीय अधीक्षक लहाने यांनी सांगितले. गैरहजर राहणाºया डॉक्टरांवर कारवाई करावी असा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे १९ सप्टेंबर रोजी सादर केला. या अहवालानुसार त्या चारही वैद्यकीय अधिकाºयांवर कोणती कारवाई होते, याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा