फसवणूकप्रकरणी चार वाहक निलंबित
By Admin | Updated: August 10, 2014 00:10 IST2014-08-10T00:10:38+5:302014-08-10T00:10:38+5:30
शेगाव आगारातील कार्यरत चार वाहकांना ५ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले आहे.

फसवणूकप्रकरणी चार वाहक निलंबित
शेगाव : एसटी बसने प्रवास करणार्या प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्याचे रा.प. मंडळाच्या भरारी पथकाच्या धाडीत निष्पन्न झाले. त्यामुळे शेगाव आगारातील कार्यरत चार वाहकांना ५ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले आहे. शेगाव आगारातील वाहक नितीन सरोदे हे शेगाव खामखेड शेड्युल घेऊन जात होते. तर वाहक के. व्ही. शेंडे यांची शेगाव- अमरावती बसमध्ये ड्युटी लागली होती. दरम्यान, रा.प. अकोला विभागाच्या भरारी पथकाने दोन्ही बसची तपासणी केली असता वाहकांनी प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्याचे वेगवेगळ्या दिवशी आढळून आले. या शिवाय वाहक एस.के.राठोड व राम जाधव हे उज्जैन (म.प्र.) ते शेगावदरम्यान प्रवासी घेऊन येत असताना रा.प. धुळे, विभाग भरारी पथकाने बसची तपासणी केली असता प्रवाशांचे पैसे घेऊन तिकिटे न दिल्याचे निष्पन्न झाले. वाहकांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे धुळे-अकोला विभागाच्या भरारी पथकाने चारही वाहकांचा सविस्तर अहवाल विभाग नियंत्रकांकडे सादर केला. त्यानंतर उपरोक्त चारही वाहकांना निलंबित करण्यात आले.