विहिरीत आढळला मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:00 IST2017-07-18T01:00:21+5:302017-07-18T01:00:21+5:30

अनसिंग : येथून जवळच असलेल्या लाखी रस्त्यानजिक विहिरीमध्ये ३२ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळल्याची घटना १७ जुलैला सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली.

Found dead well! | विहिरीत आढळला मृतदेह!

विहिरीत आढळला मृतदेह!

लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग : येथून जवळच असलेल्या लाखी रस्त्यानजिक विहिरीमध्ये ३२ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळल्याची घटना १७ जुलैला सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, परिसरातील अनसिंग-लाखी रस्त्यानजिक भांदुर्गे यांच्या शेतीमधील विहिरीमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच ठाणेदार योगिता भारव्दाज आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. सदर मृतदेह संतोष पांडुरंग पांडे (रा.मंगरूळपीर, मंगलधाम) यांचा असल्याचे उघड झाले. मृत्यूचे कारण अद्याप उघडकीस आले नाही. घटनेचा पुढील तपास ठाणेदार भारव्दाज करीत आहेत.

Web Title: Found dead well!