नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:01 IST2017-09-22T01:01:37+5:302017-09-22T01:01:44+5:30

वाशिम: तालुक्यातील काजळंबा येथील सुमन सुभाष इंगोले (वय ४0) ही महिला गुरे चारून घरी परत येत असताना नाल्यामध्ये पाय घसरून पडली. नाल्याला पूर आल्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिचा मृतदेह मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा धरणात मिळाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने गुरुवारी दिली. 

Found dead body of a woman carrying a nullah! | नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला!

नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला!

ठळक मुद्देकाजळंबा येथील घटना मंगरूळपीर तालुक्यात आढळला मृतदेह 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील काजळंबा येथील सुमन सुभाष इंगोले (वय ४0) ही महिला गुरे चारून घरी परत येत असताना नाल्यामध्ये पाय घसरून पडली. नाल्याला पूर आल्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिचा मृतदेह मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा धरणात मिळाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने गुरुवारी दिली. 
प्राप्त माहितीनुसार वाशिम तालुक्यातील काजळंबा येथील सुमन इंगोले ही महिला नेहमीप्रमाणे म्हशी राखण्यासाठी शेतामध्ये गेली होती. सायंकाळी घरी परत येत असताना वाटेतच असलेला नाला ओलांडताना तिचा तोल गेल्याने ती नाल्यात पडली. पाऊस आल्यामुळे नाला पाण्याने भरून वाहत होता. सुमन इंगोले ही घरी न पोहचल्यामुळे तिचा कुटुंबीयांनी व गावातील मंडळींनी रात्रभर परिसरात शोध घेतला; परंतु रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागू शकला नाही. अखेर गुरुवारला तिचा मृतदेह मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा येथील धरणात आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली. 
या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

Web Title: Found dead body of a woman carrying a nullah!