माजी आमदारांचा वीजपुरवठा खंडित!
By Admin | Updated: September 13, 2016 02:52 IST2016-09-13T02:52:46+5:302016-09-13T02:52:46+5:30
जुने वीज मीटर बदलून नवीन बसविण्याच्या नावाखाली माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या निवासस्थानाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

माजी आमदारांचा वीजपुरवठा खंडित!
शिरपूर (जैन)(जि. वाशिम), दि. १२ : जुने वीज मीटर बदलून नवीन बसविण्याच्या नावाखाली माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या निवासस्थानाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे शिंदे यांच्या कुटुंबियांना चक्क रात्रभर अंधारात राहावे लागले. ११ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या प्रकाराविषयी शिंदे यांनी महावितरणप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली. शिरपूर येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा शिंदे येथे वीज ग्राहकांचे जुने मीटर काढून नवीन बसविण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. त्यानुसार, गावामध्ये नवीन मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना वीज कर्मचार्यांनी ११ सप्टेंबर रोजी माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या निवासस्थानी कुणी हजर नसतानाही जुने मीटर काढून नवीन मीटर बसविले; मात्र या मीटरमधून वीज प्रवाह सुरू न केल्याने शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना ११ सप्टेंबरची रात्र अंधारात काढावी लागली. अगोदरच गावात तापाचे रुग्न वाढत असताना वीज कर्मचार्यांनी घरी कुणी नसताना केलेल्या या कामाबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. ११ सप्टेंबर रोजी मी, वडील आणि कुटुंबातील कुणीच घरी नसताना महावितरणने मीटर बदलले. यामुळे अंधारात राहावे लागले, असे गजानन शिंदे यांनी सांगितले.