शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 15:45 IST

Former MLA Prakash Dahake passes away : अमरावती येथे खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

कारंजा लाड (वाशिम) : सहकार क्षेत्रात राजकीय पकड असणारे कारंजा मानोरा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांचे दिर्घ आजाराने नागपुर येथील खाजगी रूग्णालयात १० मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान निधन झाले. कारंजातील ‘प्रकाशपर्व’चा अंत झाल्याची प्रतिक्रीया त्यांच्या समर्थकांकडून तसेच राजकीय वतुर्ळातून उमटत आहेत.परिवारातून राजकारणाचा वारसा लाभलेले प्रकाश डहाके हे सतत कारंजा मतदार संघाच्या विकासासाठी झटत राहीले. समाजकारण करता करता त्यांनी १९९५ मध्ये कारंजा मतदारसंघाची राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून निवडणुक लढविली. त्यात त्यांचा पराभव होउन पुन्हा. त्यांनी हार न मानता १९९९, २००४ मध्ये विधानसभेची निवडणुक लढविली. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २००४ मध्ये ते  केवळ ४७ मतांनी पराभुत झाले. अपयशाने खचून न जाता मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावत त्यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवित कारंजा विधानसभा मतदारसंघातून तब्बल ३० हजार ३०७ मताधिक्याने विजय मिळविला. याच काळात प्रकाश डहाके यांनी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही सांभाळले. डहाके हे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार असल्याने आणि त्यांचे जावई गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री असल्याने त्यांच्या सहकार्याने डहाके यांनी कारंजात महत्वाकांशी प्रकल्प राबवून शहरासह तालुक्याचा विकास केला.  ते गेल्या पंधरा वषार्पासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद यशस्वीरित्या सांभाळत होते. प्रकाश डहाकेनां राजकारणात 'दादा' म्हणून एक वेगळीच ओळख होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परीषद, खरेदी विक्री संघ तसेच सेवा सहकारी सोसायटीची निवडणुकीत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने विजयी होतात. प्रकाशदादांची तालुक्यात प्रकाश पर्व म्हणुन एक सामाजीक व राजकीय क्षेत्रात ओळख होती. दरम्यान, त्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते ९ मे रोजी कोरोनातून मुक्त झाले. दरम्यान, प्रकृती अचानक खराब झाल्याने १० मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अंत्यविधीसाठी गर्दी न करण्याचे कुटुंबियांचे आवाहनमाजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन झाले असून, कोणीही आमच्या राहत्या घरी अथवा स्मशानभूमीमध्ये येऊन अंत्यविधीसाठी गर्दी करू नये. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने घरूनच अंत्यदर्शनाची व अंत्यविधीची सोय सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे कोणीही खेडेगावातून तसेच शहरांमधून घराकडे येऊन गर्दी करु नये, अशी भावनिक हाक प्रकाश डहाके यांचे सुपूत्र कौस्तुभ यांनी दिली आहे.

टॅग्स :Prakash Dahakeप्रकाश डहाकेKaranjaकारंजा