विभागीय शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 02:43 PM2019-11-27T14:43:10+5:302019-11-27T14:43:18+5:30

एकूण २ हजार ९८४ शिक्षक मतदारांचा समावेश असल्याचेही उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले.

Formation of Voter List of Divisional Teacher Constituency | विभागीय शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विभागीय शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार, १ आॅक्टोंबर २०१९ पासून पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. याअंतर्गत २,९८४ शिक्षक मतदारांची नोंदणी झाली असून २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात तशी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर ९ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतात. तसेच नाव नोंदणी देखील करता येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप महाजन यांनी कळविले आहे.
शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदणी न केलेल्या शिक्षकांना ९ डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करून मतदार यादीची छपाई करण्यात येईल. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मालेगाव तालुक्यातील ४००, रिसोड ६४५, वाशिम ७९०, मंगरूळपीर ३७६, कारंजा ५६३ व मानोरा तालुक्यातील २१० अशा एकूण २ हजार ९८४ शिक्षक मतदारांचा समावेश असल्याचेही उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले.
 

ग्रा.पं. पोटनिवडणूक; सरपंचपदाचे दोन; तर सदस्यपदाच्या ३१ उमेदवारांची माघार

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींमध्ये थेट निवडणुकीद्वारे सरपंच आणि १८८ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त पदांवर सदस्य निवडीसाठी पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी, २५ नोव्हेंबरला सरपंचपदाच्या दोन; तर सदस्यपदाच्या ३१ उमेदवारांनी माघार घेतली असून काही ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये आता ८ डिसेंबरला मतदान होणार आहे.

आरक्षित जागांवर जि.प., पं.स. निवडणूक लढणाºया उमेदवारांनी संपर्क साधावा
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाºया ६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ते २३ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार असून ७ जानेवारी २०२० रोजी मतदान व ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाºया, नामनिर्देशन पत्र दाखल करणाºया इच्छुक उमेदवारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव किंवा अर्ज संबंधित पडताळणी समिती कार्यालयाचे संशोधन अधिकारी यांच्याकडे सादर केल्याची पोहोच किंवा पुरावा नामनिर्देशन पत्रासोबत सादर करायचा असून संबंधितांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Formation of Voter List of Divisional Teacher Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम