पांगरी महादेव येथे वन महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST2021-07-07T04:51:36+5:302021-07-07T04:51:36+5:30

पांगरी महादेव येथे आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक उत्तमराव जिरे तर प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, ...

Forest Festival at Pangri Mahadev in excitement | पांगरी महादेव येथे वन महोत्सव उत्साहात

पांगरी महादेव येथे वन महोत्सव उत्साहात

पांगरी महादेव येथे आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक उत्तमराव जिरे तर प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, वनपाल किशोर सरनाईक, वनरक्षक प्रतिभा अहिर सर्व गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात गावशिवारातील प्रसिद्ध शिवमंदिर टेकडी परिसरात गावकऱ्यांनी श्रमदान केले, सर्व महिलांच्या हस्ते वृक्षारोपण केले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारीवर्गाशी गावकऱ्यांचा ‘वनसंवाद’ कार्यक्रम पार पडला. यावेळी, ‘पांगरी येथील गावकऱ्यांनी गावाची ग्रामपंचायत नोंद नसल्याने अनेक समस्या असूनही त्यावर मात करत ग्रामविकासाचा जो सामूहिक विडा उचललेला आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे. एका व्यक्तीने गावाला दिशा देण्याचे जे काम केले ते वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढला असून वनविभाग मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत झालेला दिसतो आहे. आपल्या गावशिवारातील जंगल क्षेत्राचे संवर्धन व संरक्षण करणे ही गावकऱ्यांची जवाबदारी आहे. जंगलातील वृक्ष असो किंवा वन्यप्राणी असो त्याचे कटाक्षाने संरक्षण व संवर्धन गावकऱ्यांनी करायला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावर मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध बांबू लागवड करावी, असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. शिंदे यांनी गावकऱ्यांशी संवाद करताना मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसभा समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी केले.

______________

ग्रामस्थांचा पुढाकार प्रेरणादायक

कार्यक्रमाच्या अखेरीस वन अधिकाऱ्यांसमोर महिला, पुरुष, युवक व बालगोपालांनी हात उंचावून, ‘आमचे गाव-आमचे जंगल-आम्ही संरक्षक’ अशी घोषणा करत एकमुखाने जंगलाच्या संवर्धन व संरक्षणाची हमी दिली. पांगरी येथील गावकऱ्यांनी गावाची ग्रामपंचायत नोंद नसताना लोकसहभाग आणि श्रमदानाचा आधार घेत गावांतील अनेक समस्या सोडविल्या. त्यांनी घेतलेला ग्रामविकासाचा विडा अत्यंत प्रेरणादायी आहे.

050721\1556-img-20210705-wa0028.jpg

श्रमदान करतांना पांगरी येथील नागरिक

Web Title: Forest Festival at Pangri Mahadev in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.