हिरे चोरीप्रकरणी परदेशी नागरिक गजाआड
By Admin | Updated: October 18, 2014 01:11 IST2014-10-18T01:11:52+5:302014-10-18T01:11:52+5:30
24 लाख रुपये किमतीचे हिरे चोरी केल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी एका परदेशी ज्येष्ठ नागरिकाला अटक केली आहे.

हिरे चोरीप्रकरणी परदेशी नागरिक गजाआड
वाशिम : शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या चोर्या व घरफोडीच्या घटनांतील सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यांनी आज दिली. शहरातील आययूडीपी व लाखाळा परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनांत सहभागी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील वेणी येथील किरण रमेश वाघमारे व राजू तुकाराम वाघमारे या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. सदर आरोपींची कसून चौकशी केली असता, शहरात दोन घरफोड्या व दोन दुचाकी चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हा पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पथकाचे नेतृत्व केले. या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक कैलास इंगळे, जमादार उत्तम गायकवाड, विष्णू वाघमारे, संजय नंदकुले, गणेश सरनाईक, नायक पोलिस शिपाई, राहुल व्यवहारे, अरविंद राठोड, नंदकिशोर भडके, नागोराव खडसे, शिपाई गजानन गोटे, गजानन शिंदे, विपुल शेळके, महिला पोलिस शिपाई रजनी सरकटे, चालक जमादार आत्माराम राठोड, मधूकर लांभाडे यांचा समावेश होता.