बळजबरीने दुचाकी पळविली
By Admin | Updated: March 28, 2016 02:25 IST2016-03-28T02:25:50+5:302016-03-28T02:25:50+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना.

बळजबरीने दुचाकी पळविली
वाशिम: किरकोळ कारण समोर करून एका ५६ वर्षीय इसमाची मोटारसायकल एका महिलेसह तिघांनी संगनमत करून पळवून नेली. ही घटना शनिवारला दुपारी १२:३0 वाजताच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. धानोरा खुर्द (ता.जि. वाशिम) येथील चिंतामन शंकर भालेराव या इसमाची मोटारसायकल (एम.एच. ३७ ई ७२११) विमलबाई नवघरे (रा. गव्हानकर नगर, वाशिम) व तीन इसमांनी संगनमत करून शिवाजी चौकामधून जबरदस्तीने हिसकावून पळवून नेली, अशी तक्रार भालेराव यांनी वाशिम शहर पोलिसात दिली. पोलिसांनी विमलबाई नवघरे हिच्यासह तिघांवर भादंविचे कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.