जुगार अड्डय़ांवर धाड; १९ जणांवर कारवाई
By Admin | Updated: June 28, 2014 01:40 IST2014-06-28T00:52:43+5:302014-06-28T01:40:59+5:30
रिसोड शहरातील घटना

जुगार अड्डय़ांवर धाड; १९ जणांवर कारवाई
रिसोड : जिल्हा गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे विविध ठिकाणी जुगार अड्डय़ावर धाड टाकून १९ जणांवर कारवाई केली असल्याची घटना २७ जून रोजी सायंकाळी घडली आहे.
तालुक्यातील लोणी येथे पथकाने धाड टाकली असता १८ जण जुगार खेळतांना आढळले. या ठिकाणाहून नगदी ७ हजार ३९0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी १८ जणांना अटक कररुन त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच रिसोड येथील बसस्टॅन्डजवळील वाशिम नाक्यावर पथकाने धाड टाकून एकास जुगार खेळताना अटक केली. त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.
या ठिकाणी २१८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही घटनेत एकूण १९ जणांवर जुगार अँक्ट नुसार कारवाई करण्यात आली आहे.
सदर संयुक्त पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अंबुलकर व पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नागरे, कर्मचारी ढेंगळे यांचा समावेश होता.