प्रलंबित मागण्यांसाठी लोककलावंत आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:25+5:302021-08-22T04:44:25+5:30
----------- रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष वाशिम: शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत ही समस्या ...

प्रलंबित मागण्यांसाठी लोककलावंत आक्रमक
-----------
रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष
वाशिम: शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत ही समस्या दूर करण्यासाठी आमदार लखन मलिक यांनी १६ जुलै रोजी शहरात आंदोलन केले. तथापि, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नसून, या आंदोलनाच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
-----------
पावसाळ्यातही बाजार समितीत मोठी आवक
वाशिम: पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले आहेत. या काळात बाजार समितीत शेतमालाची आवक फारशी होत नाही; परंतु पीककर्जास विलंब लागत असल्याने, तसेच घरात शेतमाल शिल्लक असल्याने शेतीकामांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी शेतमालाची विक्री करीत असल्याने शेतमालाची मोठी आवक बाजार समितीत होत आहे.
--------
तिसऱ्या लाटेची तयारी, मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात मुलांसाठी १०० खाटा, तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.
--------
कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड
वाशिम: कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कीटकशास्त्रज्ञ आर.एस. डवरे यांनी सोयाबीन, तूर या पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन तसेच शेंडे खुडणे व तणनाशकाचा वापर याबाबतचा तांत्रिक संदेश शेतकऱ्यांना दिला.