शेलुजवळच्या नाल्याला पूर; औरंगाबाद- नागपूर द्रूतगती मार्गावरील वाहतूक प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:47 PM2020-07-16T12:47:59+5:302020-07-16T12:49:18+5:30

औरंगाबाद ते नागपूर या द्रूतगती मार्गावरील वाहतूक सकाळच्या सुमारास प्रभावित झाली होती.

Flood near Shelu; Aurangabad-Nagpur Expressway affected! | शेलुजवळच्या नाल्याला पूर; औरंगाबाद- नागपूर द्रूतगती मार्गावरील वाहतूक प्रभावित !

शेलुजवळच्या नाल्याला पूर; औरंगाबाद- नागपूर द्रूतगती मार्गावरील वाहतूक प्रभावित !

Next
ठळक मुद्देशेलुबाजार परिसरात संततधार पाऊस झाला. नाल्याला पूर आल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.


लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम) : गुरूवार, १६ जुलै रोजी पहाटेपासून संततधार पाऊस असल्याने शेलुबाजारनजीकच्या नाल्याला पूर आला. परिणामी, औरंगाबाद ते नागपूर या द्रूतगती मार्गावरील वाहतूक सकाळच्या सुमारास प्रभावित झाली होती.
बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रिमझिम पाऊसही झाला. दरम्यान, गुरूवारी पहाटेपासून मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे शेलू येथून वाहणाºया नाल्याला पूर आल्याने शेलुबाजार चौकातही पाणी साचले होते. पूरामुळे औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पूरही कमी झाला. दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, नाल्याच्या काठावरील शेतातही पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

Web Title: Flood near Shelu; Aurangabad-Nagpur Expressway affected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.