फ्लेक्स व्यवसायातून लाखमोलाची उलाढाल
By Admin | Updated: August 26, 2014 22:49 IST2014-08-26T22:49:58+5:302014-08-26T22:49:58+5:30
निवडणुकीची तारीख अथवा उमेदवार्या अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी जिल्हाभरात बॅनरबाजीचे युद्ध रंगु लागल्याचे दिसून येत आहे.

फ्लेक्स व्यवसायातून लाखमोलाची उलाढाल
वाशिम : विधानसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख अथवा उमेदवार्या अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी जिल्हाभरात बॅनरबाजीचे युद्ध रंगु लागल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघाचा व्याप पाहता सर्वच मतदारापर्यंत उमेदवारांना पोहोचवणे अशक्य आहे. त्यामुळे नेते उमेदवाराचे छायाचित्र आणि निवडणूक चिन्ह मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी होर्डींग्ज, फ्लेक्स, पोस्टरला प्राधान्य देतात, हा इतिहास आहे; मात्र यंदा काही उमेदवारांनी आतापासूनच होर्डींग्ज लावण्याचा सपाटा चालविला असल्यामुळे फ्लेक्स व्यवसायाला तेजीचे दिवस आले आहे. निवडणुकीदरम्यान या व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणार्या साहित्याची जुळवाजुळव इच्छुकांनी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवरील संघटना आणि पदाधिकार्याच्या पाठिंब्याच्या बळावर उमेदवारी मिळविण्यासाठी तडजोड सुरू आहे. यातूनच आपला जोर दिसावा यासाठी बहुरंगी फ्लेक्सवर सर्वांचाच जोर दिसून येत आहे.
वाशिममध्ये फ्लेक्स प्रिंटींग व्यवसाय मोठय़ा प्रमाणात असला तरी हायस्पीड प्रिंटींगचे मशीन खूप कमी आहेत. हायस्पीड प्रिंटींग मशीनद्वारे केलेल्या मल्टीफ्लेक्सचा छपाईचा दर्जा उत्तम असल्याने अनेक इच्छुक ज्यांच्याकडे हायस्पीड प्रिंटींग मशीन आहे, त्यांनाच कामे देण्याच्या मनस्थितीत आहेत. मल्टीफ्लेक्स प्रिंटींग व्यवसायात स्पर्धा वाढली तरी छपाईच्या दरात घट झाली असल्याचे एका संचालकाने सांगितले