गावरान आंबे खरेदीसाठी लोकांची झुंबड
By Admin | Updated: May 15, 2017 01:20 IST2017-05-15T01:20:16+5:302017-05-15T01:20:16+5:30
शिरपूर जैन : अलिकडच्या काळात नामशेष होत चाललेल्या गावराण आंब्यांची मागणी मात्र कमी झालेली नसून, गावराण आंबे खरेदीसाठी शिरपुरच्या बाजारात ग्राहक मोठी गर्दी करताना दिसत आहेत.

गावरान आंबे खरेदीसाठी लोकांची झुंबड
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : अलिकडच्या काळात नामशेष होत चाललेल्या गावराण आंब्यांची मागणी मात्र कमी झालेली नसून, गावराण आंबे खरेदीसाठी शिरपुरच्या बाजारात ग्राहक मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
फळांचा राजा म्हणून ओळखल जाणाऱ्या आंब्याच्या अनेक जाती आहेत. यामध्ये बैगनपल्ली, दसेरी, केसर, पायरी, हापूस, लंगडा, भागमभाग, तोतापुरी (कलमी), नीलम, गोवा मानकूर, रत्ना, मल्लिका, आम्रपाली, सुवर्णरेखा, मालगीज, मालगोबा, नागीण, भोपळी आणि बोरशा यांचा प्रामुख्याने समावेश आहे; परंतु या सर्व आंब्यापेक्षा विदर्भातील गावराण आंब्यांची गोडी सर्वांनाच भुरळ घालणार आहे. अलिकडच्या काळात गावराण आंबे वृक्षतोडीमुळे मिळेनासे झाली असले तरी, या आंब्यांना आजही मोठी मागणी आहे. सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम जोरात सुरुआहे. विविध ठिकाणच्या बाजारात अनेक विक्रेते आंब्याची दुकाने थाटून बसल्याचे दिसतात. तथापि, गावराण आंब्याची दुकाने मात्र मोजकीच असल्याने गावराण आंंब्याच्या खरेदीसाठी लोक आतूर असल्याचे दिसते. त्यामुळे शिरपूर बसस्थानक परिसरात उत्तप्रदेशातून आणलेल्या दशहरी, लंगडा, केसर या आंब्यांवर परिसरातील गावराण आंबा भारी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. गावराणी आंबा बाजारात विक्रीला येण्यापुर्वी बारात उत्तरप्रदेशातील दशहरी, लंगडा केसर बदाम या आंब्याला ग्राहकांकडून मोइी मागणी होत होती उत्तरप्रदेशातील हे आंबे फेब्रुवारी पासूनच कृतीम पद्धतीने पिकवून बाजारात विक्री जात आहेत तर गावराण आंबा हा एप्रिल मध्ये पिकतो आता गावराण आंब्याने बाजारात परप्रांतीय आंब्याला मोठी टक्कर दिलीअसून दशहरी लंगडा, केसर, बदाम या आंब्याची मक्ेतदरी मोडीत काढून गावरान आंब्याने बाजारात दबदबा कायम केला परसिरात आंबा बसस्थानक परिसरात दररोज सकाळी ७ ते १० या काळात आंबे विक्रीसाठी आणित आहे या काळात परप्रांतीय आब्याला दुकानाकडे कुणी पाहतही नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावराणी आंबा परप्रांतीय आंब्यावर भारीच असल्याचे सिद्ध होत आहे.